महानगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
शहरातील काही दिवसांपासून संवेदनशील बनलेल्या भावसिंग पुरा भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
मागील काही दिवसांपासून छावणी पोलिस स्टेशन व मनपा झोन क्रं.०१ अंतर्गत असलेल्या भावसींगपुरा पेठेनगर येथील शाक्य नगर लगत असलेल्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेवरील एकूण २२ अनधिकृत टपऱ्या व शेड चे अतिक्रमण आज पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले आहे.
याठिकाणी साधारणतः १५x१५,१५x२० व १० x१० या आकारातील शेड व टपऱ्यांचे अतिक्रमण करण्यात आले होते.या ठिकाणी मांस,भाजी पाला व किरकोळ साहित्य विक्री चे दुकाने थाटण्यात आली होती.हे सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करून यातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.तसेच या ठिकाणी अवैध दारू विक्री ,सुरू होती यामुळे या ठिकाणी टवाळखोर व नशेखोरांचा सुळसुळाट झाला होता यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.मागील काही दिवसांपासून हा भाग संवेदनशील बनला होता.या भागातील नागरिकांनी काल दी.१६ फेब्रुवारी रोजी मां.पोलीस आयुक्त कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले होते.याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली.या अनुषंगाने आज मा.पोलीस आयुक्त कार्यालय व छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका याच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मा.पोलीस आयुक्त मनोज लोहिया व आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी,उप आयुक्त मंगेश देवरे,पोलीस उप आयुक्त नितीन बघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संजय सुरडकर, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद,रविंद्र देसाई,सहायक पोलीस आयुक्त धनंजय पाटील,पोलीस निरीक्षक होळकर,पो.उप निरीक्षक शिंदे,अतिक्रमण विभाग व पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली.अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
Add comment