Lokvijay

हज हाऊसचा लोकार्पण सोहळा

मराठवाड्याच्या विकासासाठी हज हाऊस सहाय्यभूत-अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका)-मुस्लिम भाविकांची पवित्र हज यात्रा करण्यात ‘हज हाऊस’, ही एक उत्तम सुविधा आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला हे हज हाऊस सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे व्यक्त केला.

छत्रपती संभाजी नगर शहरातील हज हाऊसचे लोकार्पण आज श्री. सत्तार यांच्या हस्ते पार पडले

यावेळी खासदार इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रदीप जयस्वाल, आ. उदयसिंह राजपूत, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांच्यासह अल्पसंख्यांक विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

श्री. सत्तार म्हणाले की,हज हाऊस मराठवाड्यातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी उत्तम सुविधा आहे.याद्वारे मुस्लिम बांधवांची हज यात्रा सुसह्य आणि जलद होण्यास मदत होईल. तसेच विभागामार्फत आमखास मैदानाचा विकास करून येथे क्रीडा संकुल उभारण्यात येणार,तसेच अल्पसंख्याक विकास आयुक्तालय ही सुरू करण्यात येणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या यात्रेत सहाय्यभूत ठरणारे हज हाऊस हे संभाजीनगरच्या विकासाला साह्यभूत ठरेल असेही सत्तार म्हणाले.

Add comment