Lokvijay
blank

भक्तीमय वातावरणात पैठणच्या शांतिब्रम्ह श्री एकनाथ महाराज समाधी मंदिरातील चतु:शतकोत्तर रौप्य महोत्सवाची सांगता

हभप विनीत महाराज गोसावी पठैणकर यांच्या पुढाकाराने भक्तांनी अनुभवला रौप्य महोत्सवी सोहळा

छत्रपती संभाजी नगर | दि. २५: शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज वारकरी फडाच्या विद्यमाने व हभप श्री.छय्यामहाराज गोसावी पठैणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिब्रह्म श्री सतं एकनाथ महाराजांच्या समाधीच्या चतु:शतकोत्तर रौप्यमहोत्सवी ४२५ व्या वर्षानिमित्त व अखडं हरिनाम सप्ताहाच्या २५ व्या रौप्यमहोत्सवानिमित्त भव्य अखडं हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज एकनाथी गाथा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पैठणच्या संत एकनाथ समाधी मंदिरात शनिवारी (दि.२४) पार पडला. या सोहळ्याचे आयोजन विनीत महाराज गोसावी पठैणकर (शांति ब्रह्म श्री.एकनाथ महाराजांचे१४ वे वशंज, श्रीक्षेत्र पठैण) यांच्या सकंल्पनेतून करण्यात आले होते. यावेळी संत एकनाथांचा जयघोष करत टाळ, मृदुंगाच्या गजरात उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभवला.

blank

या सोहळ्याचे आयोजन १६ ते २४दरम्यान आयोजित करण्यात आला होता. नऊ दिवसांच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्यात भक्तीचे अनेक रंग आणि ज्ञानाचा गंध प्रत्येक भावि कांना अनभुवायला मिळाला. ह.भ.प विनित महाराज गोसावी पठैणकर यांच्या सकंल्पनेतनू प्रथमच नाथ मदिंरात लक्षवेधी फुलांची आरास करण्यात आली होती. हरि भक्त पारायण श्री.छय्यामहाराज गोसावी पठैणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथी गाथा पारायणास राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पालकमंत्री संदीपन भुमरे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून सर्व भाविकांचे आभार मानले. पैठणच्या प्रत्येक भाविकांसाठी श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये आपल्या हक्काची २ एकर जागा उपलब्ध करून देत तेथे भव्य भक्त निवास उभारण्यात येत असल्याचे सांगत त्याचे काम प्रगतीपथावर सुरु झाल्याचे स्पष्ट केले. अंतर्गत रस्ते यासह विविध मुलभूत सोयी सुविधा आगामी काळात प्रत्येक भाविकास मिळतील असे सांगत मी भाग्यशाली आहे कि हे काम माझ्या कार्यकाळात होत आहे. असे मंत्री भुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नमूद केले. येणाऱ्या भाविकांची जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था करून विनीत महाराज यांनी प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या सोहळ्यात ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज नामदास, ह.भ.प तुळशी महाराज काकड, ह.भ.प महंत विठ्ठल महाराज, ह.भ.प श्रीराममहाराज झिंजुर्के, ह.भ.प बद्रीनाथ महाराज नवल, ह.भ.प चद्रंशखेर महाराज देगलरूकर, ह.भ.प केशव महाराज उखळीकर, ह.भ.प योगिराज महाराज गोसावी पठैणकर या कीर्तनकारांनी आपल्या अमोघ वाणीतनू उपस्थितांचे प्रबोधन केले. विशषे म्हणजे करवीर पिठाधीश्वर जगद्गुरू श्री शंकराचार्य,परमपूज्य सच्चिदानदं अभिनव विद्यानरसिहं भारती स्वामीजी, यांनी पत्र लिहून आपला कृपाशीर्वाद पाठवला व सोहळ्यास पाठबळ दिले. तसेच धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज (जोशी बाबा) बीड आणि सद्गुरू सखाराम महाराज संस्थान अमळनेर, येथील परमपूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांनी भेट देऊन सोहळ्यास संबोधित केले. या सोहळ्यास त्यांनी कृपाशीर्वाद देऊन या सोहळ्याची शोभा वाढवली. सोहळ्यात दररोज अनेक स्तुत्य उपक्रम पार पडले. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ह.भ.प विनित महाराज गोसावी पठैणकर यांनी शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज वारकरी फडाच्या सहाय्याने अथक परिश्रम घेतले. सोहळ्यात मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील अनेक नाथ भक्तांनी पठैण गाठले आणि ‘याची देही, याची डोळा’ या सोहळ्याचे साक्षीदार झाले. ज्यांना शक्य होऊ शकले नाही, त्यांच्यासाठी आयोजक ह.भ.प विनित महाराज गोसावी पठैणकर यांच्या “सतं एकनाथमहाराज” या youtube चॅनल च्या माध्यमातनू या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून दिले. हा दैदीप्यमान सोहळा त्यांनी कानकोपऱ्यातल्या भक्तांपर्यंतर्यं पोहोचवला. अत्यतं भक्तिमय आणि अश्रूंच्या भावनिक बंधातून , ह.भ.प विनित महाराज गोसावी पठैणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.

प्रसिद्धी प्रमुख

शांति ब्रह्म श्री.एकनाथ महाराज वारकरी फड,
श्रीक्षेत्र पठैण, छत्रपती संभाजी नगर.

Add comment