Lokvijay

मुलीच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’

मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग या विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘माझी कन्या भाग्यश्री’ (सुधारीत) ही योजना अधिक्रमित करुन राज्यात दि.१ एप्रिल २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेची उद्दिष्टे :-

  • मुलीच्या जन्मास प्रोत्साहान देऊन मुलींचया जन्मदर वाढविणे.
  • मुलीच्या शिक्षणास चालना देणे.
  • मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
  • कुपोषण कमी करणे.
  • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती तसेच इतर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दि.३१.१०.२०२३नुसार राहणार आहे. तसेच या आदेशाप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागातील (छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हा) पात्र लाभार्थी व माता यांचे संयुक्त (POSB) पोस्ट ऑफिस बचत खाते आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये उघडून या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभर्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

पोस्ट ऑफिस बचत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

  • मुलीचे जन्म प्रमाण पत्र.
  • मुलीचे आधार कार्ड, आई चे आधार कार्ड व PAN कार्ड
  • मुलीचे व आई चे संयुक्त ३ फोटो व आवश्यक कागद पत्रे इ.
  • पोस्ट ऑफिस बचत खाते उघडण्यासंदर्भात सर्व माहिती छत्रपती संभाजीनगर विभागातील नजीकच्या प्रत्येक डाकघर, शाखा डाकघर कार्यालयात उपलब्ध आहे.
  • सर्व पात्र लाभार्थीनी, जिल्ह्यातील सर्व डाकघरे आणि शाखा डाकघर मध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते (POSB) उघडून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर जी हरी प्रसाद यांनी केले आहे.

माहिती संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

1 comment