Lokvijay

मराठा आरक्षण सल्लागार समितीची बैठक संपन्न

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नेमलेल्या न्यायमूर्ती डी.बी. भोसले(निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची आज सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या समितीने केलेली आतापर्यंतचे कार्यवाही, कुणबी नोंदी शोधण्याकरिता करत असलेले विशेष कक्षा मार्फत मार्फत ची कार्यवाही, तसेच समितीचा पहिला अहवाल आणि दुसरा अहवाल दिल्यानंतर समितीच्या कालावधीत शोधलेल्या विविध नोंदी असणाऱ्या कुणबी वारसदारांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाही बाबत आणि समितीस देण्यात आलेल्या मुदत वाढीपर्यंत करावयाची कार्यवाही आणि त्याच्या दिशेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आंदोलनाच्या अनुषंगाने काढण्यात आलेली सगेसोयरे बाबतची अधिसूचना, त्याचबरोबर आतापर्यंत केलेली कार्यवाही, आरक्षण बाबत विविध न्यायालयातील याचिका यांच्याबाबत ही चर्चा करण्यात आली.

नुकताच पूर्ण झालेला मागासवर्गीय आयोगामार्फत करण्यात आलेल्या सर्वेच्या अनुषंगाने समितीसमोर सुमंत भांगे सचिव (सावीस) यांनी भूमिका मांडली. आरक्षणाच्या अनुषंगाने निवृत्त न्यायमूर्तींच्या नेमलेल्या समितीकरता प्रशस्त कार्यालय आणि योग्य तो कर्मचारी वर्ग देण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे याबाबत ही माहिती देण्यात आली.

बैठकीत मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती डीबी भोसले (निवृत्त) यांनी सर्वप्रथम राज्य मागासवर्ग आयोग आणि त्यांची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच ज्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणात जो सर्व्हे केला आहे त्या सर्व्हे करणाऱ्या सर्व टीमचे सर्वप्रथम अभिनंदन केले, आणि त्यांच्या या दिवस रात्र केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले इतक्या मोठ्या प्रमाणातील नोंदी शोधण्याकरता कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि या टीमचे आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाचे अभिनंदन करून त्यांचेही कौतुक केले. आंदोलनाच्या अनुषंगाने ज्या कुशलतेने सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण इतर प्रशासकीय यंत्रणेने हाताळलेले कौशल्य याबद्दल त्यांचे व्यक्तिशः अभिनंदन करून त्यांच्या संपूर्ण टीमचे धन्यवाद व्यक्त केले. त्याचबरोबर इतर बाबी बद्दल ही समिती मध्ये चर्चा करण्यात आली.

न्यायमूर्ती डी बी भोसले (निवृत्त) हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते यावेळेस न्या. मारोतराव गायकवाड, (निवृत्त), न्या. संदीप शिंदे (निवृत्त) उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि विधी परावर्षी श्रीमती सुवर्णा केवले, आरक्षणाच्या अनुषंगाने नेमण्यात आलेले विधीज्ञ श्री. अभिजीत पाटील श्री. वैभव सुखदरे आणि श्री. अक्षय शिंदे तसेच संबंधित विभागातील मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, उपस्थित होते.

Add comment