Lokvijay

मुलींनी बाल विवाह करू नये पूर्ण शिक्षण घ्यावे

दामिनी पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

माहिती व जनसंपर्क विभाग
दि.३० जानेवारी

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या मनपा केंद्रीय शाळा किराडपूरा नं.1 ऊर्दू शाळेत दामिनी पोलिस पथक यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की आजच्या काळात विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन पासून दूर राहिले पाहिजे.त्यांनी मोबाईल फोनचा दुरउपयोग टाळला पाहिजे. बाल विवाह करू नये मुलींचे वय 19 वर्ष पूर्ण होई पर्यंत विवाह करू नका. मुलींना पूर्ण शिक्षण करू दिले पाहिजे ज्यामुळे मुली भविष्यात कलेक्टर, कमिशनर, पोलिस, मोठ मोठे अधिकारी होऊ शकतात. त्याचप्रमाणे मुलींना गूडटच व बॅड टच याविषयी सांगितले. आपल्या घरामध्ये असणारे आजी आजोबा यांचा आपण आदर केलां पाहिजे.

आठवी नववी दहावीच्या मुलींना गुड टच बॅड टच व सायबर क्राईम चे दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली.
डायरेक्ट १२२ पोलीस हेल्पलाइन नंबर तसेच छेडछाड सारख्या घटना किंवा शहरात कोणी त्रास देत असेल तर नक्कीच दामिनी पथक कळवा असे आवाहन त्यांनी केले . कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका कोणत्याही अमिषाला बळी पडू नका शाळेत येताना जाताना जर कुणी वारंवार पाठीमागे येत असेल तर गाडीचा नंबर नोट करत चला असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले .

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांसाठी जनजागृती करिता विविध उपक्रम छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने शहरात राबविण्यात येत असल्याबाबतची सविस्तर माहिती दिली. यावेळी पीएसआय कांचन मिळते, दामिनी पथक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कल्पना खरात, कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे पोलीस अंमलदार सुरेखा कुकलारे शितल थोटे ,मोहसिन तडवी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रईसा बेगम आयुब खान यांनी सर्व दामिनी पथकचे आलेले पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

Add comment