Lokvijay
blank
Waheeda Rehman - Guide

पहाटेच स्वप्न – वहिदा रेहमान

तामिळनाडूत जन्म झालेल्या या स्त्रीला किती पैलू असावे, हे एक कोडं आहे, प्रत्येक कोड्यात ती नवीन कोडं निर्माण करते हे एक अजून कोडं. तहानलेल्याला पाणी मिळू नये हा विधात्याचा लाडका खेळ आहे, तो त्याला प्रत्येका बरोबर खेळायला आवडतो, हाच खेळ त्याने एका अगदी “शाय” स्वभाच्या मुलीसोबत खेळला. त्या मुलीला डॉक्टर बनायचे होते, पण वडील तिच्या तरुणपणी गेले आणि वालिदा साहेबा आजारी पडू लागल्या आणि त्या मुलीने तेलगू मधील सिल्वर स्क्रीन मध्ये पदार्पण केलं, नंतर ती आली हिंदीचित्रपट सृष्टीत – ती आली , तिने पाहिलं, तिने काळ गाजवला आणि तिने जिंकलं!!!

जी कधी गुलाबो झाली , कधी शांती , कधी जमीला, तर कधी राधा, हिंदी चित्रपट सृष्टीला पहाटे पडलेले स्वप्न आणि त्या पहाटेच्या स्वप्नांचं नाव – “वहिदा रेहमान”.

वहिदा तिच्या तेलगू सिनेमाचं यश साजरं करायला हैद्राबाद येथे गेली असताना तिची भेट झाली गुरुदत्त सोबत, त्याने तिथेच ठरवले कि मी वहिदाला मोट्ठी अभिनेत्री बनवणार. त्याला एक मुलगी हवी होती जी उर्दू अल्फाज अगदी ओघवत्या रूपाने बोलेल. १९५६ साली राज खोसला याने देवानंद आणि वहिदाला घेऊन सी. आय. डी. हा सिनेमा काढला. तुफान चालला हा सिनेमा, यातील गाणे इतके चालले, कोणी हि आज हि मुंबईत पहिल्यांदा आलं तरी तो गातो –

ये दिल है मुश्किल जिना यहा,
जरा बच के….जरा बच के
ये है बॉम्बे मेरी जान……

यात अजून गाणी होती जसं-
वहिदा वर आणि देवानंद वर शूट झालेलं त्यात देवानंद बिचारा फसलेला असतो आणि आणि वहिदा त्याला गाण्यातून सांगून बाहेर काढते-

कही पे निगाहे कही निशाना….
जिने दो जालीम बनाओ ना दिवाना….

याच सिनेमाचा एक किस्सा असा आहे, वहिदा ने आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहवले होते कि तिला हवा त्या वेळी ती कॉस्ट्यूम्स बदलू शकेल , जर काही अश्लील वाटलं तर ती कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करेल, तिला स्कर्ट आणि कुर्तीवर काहीच घालायला दिले नाही, ती अडून बसली- मला दुपट्टा हवाय, नाही तर काहीच करणार नाही, संपूर्ण दिवस तसाच गेला, राज खोसला यांनी समजावले, देवानंद ला दुसऱ्यादिवशी बाजी साठी स्वित्झर्लंड ला जायचे होते, गुरुदत्त प्यासाचा स्क्रीन प्ले साठी बाहेर गेले , त्यांना बोलावले, त्यांनी समजावले पण पालथ्या घड्यावर पाणी, गुरुदत्त बोलले मे तुम्हे तवायफ का रोल दूंगा फिर क्या करोगी, वहिदा बोलली रोल कोई भी चलेगा, कपडे अच्छे होने चाहिये….

हा सिनेमा त्या काळी खूप गाजला आणि त्या नंतर आला ५७ साली गुरुदत्त च्या ब्लॉकबस्टर ज्या साठी गुरुदत्त ने वहिदाला आणले – “प्यासा” कलकत्त्यात याची शूटिंग झाली यातील गाणं-

जाने क्या तुने कही,
जाने क्या मेने सुनी,
बात कुछ बन ही गयी…

हे गाणं रात्रीच्या शूटिंग च आहे , वहिदा भयंकर झोपायची, तर तिला रात्री गार पाण्याचा फव्वारा मारून उठवले जायचे, त्रास तर व्हायचा, पण चिडून सांगेल कोणाला. गुरुदत्त तिला एक एक हरकती करून दाखवायचा, तेंव्हा कुठे जाऊन बाई साहेब सुरु करायच्या, त्या आधी वहिदाने गुरुदत्तला ठणकावून दिले होते, कि आप मुझे चिल्लायेंगे नाही, मेरे मम्मी डॅडी मुझ पर नहीं चिल्लाते, आप चिल्लाये तो मे मद्रास चली जाऊंगी…..

हम आपकी आँखो मे, इस दिल को…..

किंवा हेमंतदांच

जाने वो कैसे लोग थे
जिनके प्यार को प्यार मिला…..

त्या नंतर दुसरा गुरुदत्त बरोबर आला पण तो सुपर डुपर फ्लॉप राह्यला – “कागज के फुल” , हा सिनेमा गुरुदत्त ने स्वतःवर काढला आहे. या सिनेमात गुरुदत्त म्हणायचा एक हिट फिल्म हो गयी एक फ्लॉप, अब कुछ नहीं चाहिये जिंदगी में. या काळापासून गुरुदत्त मृत्यू ला बोलवत राह्यला पण या सिनेमानंतर गुरुदत्त आणि वहिदा यांचे नाते खूपच घट्ट होऊ लागले आणि याचा उलट परिणाम गुरुदत्त आणि गीतादत्त यांच्या खासगी आयुष्यवर होऊ लागला. असं असलं तरीही गुरुदत्तने वहिदाला घेऊन एक अजून डाव खेळला “चौदहवी का चांद” ६० साली आला हा सिनेमा बेफाम चालला हा चित्रपट, त्यात वहिदा झोपली आहे आणि गुरुदत्त चंद्राकडे आणि वहिदा ला बघून सुरु करतो –

चौदवी का चांद हो या आफताब हो
जो भी खुदा कि कसम लाजवाब हो……

त्या नंतर ६२ साली मीनाकुमारी बरोबर आला तो साहिब बीबी और गुलाम- यात आधी वहिदाला मीनाकुमारीचा रोल करायचा होता पण नंतर गुरुदत्त ने समजावले आणि तिने स्वतः एक शॉट देऊन पहिला आणि स्वीकार केलं कि मीनाकुमारीचा रोल मला नहीं करता येणार. रोल वहिदाचा तस्सा छोटा होता पण असरदार होता. हा सिनेमा बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये पण झळकला होता आणि इथेच गुरुदत्त आणि वहिदा हा अध्याय संपतो.

या नंतर वहिदा देवानंद बरोबर आली – सीआयडी , सोलवा साल, बात एक रात कि, काला बाजार, रूप कि रानी चोरो का राजा (जुना), प्रेम पुजारी, आणि एक सिनेमा आला आणि वहिदा लोकांच्या घराघरात जाऊन पोहोचली, वहिदाच्या साडी, तिच्या केसांचा अंबाडा, तिरकस डोळ्याने समोरच्याला बघण्याचा अंदाज, अंबाड्यातील लेस वाला ब्रूच ये सगळं त्या काळी फ्याशन बनले होते, आणि वहिदा (उगाच) एक माठ फोडत बोलली होती एका अल्हड पोरीसारखी-

आज फिर जिने कि तमन्ना है,
आज फिर मरने का इरादा है

अपने ही बस मे नहीं मे
दिल है कांही तो कांही मे
जाने क्या पा के मेरी
जिंदगी ने हंस कर कहा…..

“गाईड” या सिनेमा बद्दल काय बोलावं आणि किती बोलावं, बरं आपण बोलतो त्या वेळी आपली पातळी आहे का तेवढं बोलायची हे ही आपल्याला माहिती नाहीं. एस डी बर्मन च संगीत, बर्मनदा बद्दल बोलताना वहिदा म्हणाली होती- बर्मनदा फॉल्क म्युजिक मे अच्छा खास प्रभाव छोडते है, जब गाना कर रहे थे-

पिया तो से , नैना लागे रे , नैना लागे रे
जाने क्या हो अब आगे रे…

या गाण्यात बर्मनदा वहिदाला चक्क नाचून दाखवतात, नर्तकी म्ह्णून वहिदा मोठी आणि संगीतकार म्हणून बर्मनदा मोठे आणि लता बद्दल काही न बोललेलंच बरं….

तेरे मेरे सपने अब एक रंग है
तू जहाँ भी ले जाये हम संग है….

लाख मनाले दुनिया, साथ न ये छुटेगा
आके मेरे हाथो मे , हाथ न ये छुटेगा
ओ मेरे जीवन साथी…..

किंवा- माझं या सिनेमातील आवडत गाणं –

क्या से क्या हो गया बेवफा…..तेरे प्यार मे….
चाहा क्या क्या मिला बेवफा…..तेरे प्यार मे….
चलो सुहाना भरम तो तूटा जाना के हुस्न क्या है
केहती जिसको प्यार दुनिया क्या चीज बला है
दिल ने क्या ना सहा बेवफा तेरे प्यार मे……

किंवा

दिल ढल जाये हाये रात न जाये,
तू तो न आई तेरी याद सताये….

आणि शेवटी जेव्हा वहिदा पायी चालते आणि एक एक दागिने काढते किती सुंदर तो सीन रिसीव्ह झालाय वहिदा ने त्यात खरंच प्राण आणले आणि देवानंदची गाईड हिट केली, मला वाटतं आर केंच्या कादंबरी पेक्षा गाईड ज्यास्त हिट झाली….

सत्यजित रे यांचं गुलाबो म्हणून किरदारला वहिदाने बंगाली मुलीची भूमिका केली – त्यात ती जे मिष्टी बोलते न बंगाली टोन मध्ये वाटतच नाहीं कि ती बंगाली नाहीये, हीच तर खरी ओळख आहे एका कलाकाराची. ६० साली किशोर कुमार बरोबर ती गर्ल फ्रेंड नावाच्या विनोदी चित्रपटात पण झळकली ही माहिती बऱ्या पैकी लोकांना माहीत नाही.

या नंतर वहिदा आणि देवानंद याचा पण अध्याय जवळ जवळ संपुष्टात आला होता. वहिदाचा ६६ साली दिलीप कुमार बरोबर आला सुपर डुपर हिट सिनेमा – “दिल दिया दर्द लिया” याची गाणी इतकी गाजली होती कि त्याला बिनाका गीत माला मध्ये पुन्हा पुन्हा मागणी पुन्हा पुन्हा फर्माईश यायचीच यायची-

दिलरुबा मेने तेरे प्यार मे क्या क्या न किया
दिल दिया दर्द लिया…दिल दिया दर्द लिया
कभी फुले मे गुजारी, कभी काटो मे जिया
दिल दिया दर्द लिया…दिल दिया दर्द लिया….

आणि लताच्या आवाजात वहिदा इतक्या खुबीने, सलीक्याने साकारते –

फिर तेरी कहानी याद आई
फिर तेरा फसाना याद आया….

आणि रफी बरोबर आशा भोसले –

सावन आये या ना आये
जिया जब झुमे सावन है
साज मिले जब दिल से दिल के
वही समय मन भावन है
वही समय मन भावन है….

त्या नंतर वहिदा आणि दिलीप कुमार राम और श्याम आणि आदमी (सह मनोज कुमार) – आज पुरानी राहो से कोई मुझे आवाज न दे… मध्ये आली.

राजेंद्र कुमार बरोबर – धरती , शतरंज, पालकी यात आली पण हे सिनेमे काही खास चालले नाहीं, कधी आले आणि कधी गेले समजलेच नाहीं.

राज कपूर बरोबर दोन सिनेमात आली त्यात पहिला होता – एक दिल सौ अफसाने.

जो सिनेमात काम करतो त्याची इच्छा असते कि त्याने सिनेमा काढावा आणि तो खूप चालावा.

आर के मधून गीतकार शैलेंद्र एकदा अश्याच इच्छेसह बाहेर पडले आणि त्यांनी राजकपूर ला सांगितले कि मी सिनेमा बनवतो आहे. शैलेंद्र सिनेमा बनवतो म्हणून राजकपूरपण तिकडे गेला कि मला हिरोच काम दे. राजकपूर गेला मग लता गेली , मग मुकेश गेला, मग शंकर जयकिशनला शैलेंद्रने बोलावले आणि सिनेमा काढला – “तिसरी कसम”.

याचा सिनेमाचा एक सुंदर किस्सा सांगतो तो कदाचित माहित नसेल- एकदा एका मातीच्या ढिगावर राजकपूर, आशा भोसले, वहिदा रेहमान, शंकर – जयकिशन – आणि शैलेंद्र उभे होते, त्यातून शंकर यांना मधे मधे पान खायची हुक्की येते. तसं त्यांनी एक पान खाल्लं आणि त्याची पिंक खालती टाकली ती पिंक एका दगडावर पडली आणि त्याचे शिंतोडे जयकिशनच्या पांढऱ्याशुभ्र सदरेवर पडले.

हे पाहून खोडकर आशा बोलली – पान खाये सैया हमारो , राजकपूर बोलला सावली सुरतीया और ओठ लाल लाल वहिदा मागे न राहता बोलली कि हाय रे मलमल का कुर्ता, आणि शैलेंद्र ने ओळ पूर्ण केली – मलमल के कुर्ते पे – लगेच जयकिशन बोलले – छीट लाल लाल आणि सुप्रसिद्ध गीत तैयार झाले- हे गाणं आशा भोसले बरोबर शंकर जयकिशन ने पण म्हंटल आहे-

पान खाये सैया हमारो,
सावली सुरतीया और ओठ लाल लाल
हाय रे मलमल का कुर्ता,
मलमल के कुर्ते पे छीट लाल लाल……

ह किस्सा खूप आधी ऐकला.. खरं खोटं माहीत नाही पण किस्सा आवडला..

त्या नंतर विश्वजीत बरोबर कोहरा (यात जितेंद्रने अवघ्या २ मिनिटांची भूमिका केली होती, ती कोणालाही समजली देखील नाहीं) आणि बीस साल बाद केली – पांढऱ्या साडीत –

कही दीप जले कही दिल,
जरा देख ले आके परवाने
तेरी कोनसी है मंजिल….

किंवा लताच्या आवाजात

सपने सुहाने लडकपन के….. खूप गाजले.

६८ साली वहिदा एकदम वेगळ्या रूपात आली – एका राजाची राजकुमारी झाली आणि मधुमती – मिलनचा कन्सेप्ट पुन्हा नव्याने समोर आला. वहिदा इन अँड ऍज – “नीलकमल” यात ज्या ज्यावेळी राजकुमार म्हणतो – “नीलकमल चली आओ, चली आओ, इस रंगमहल मे मेरे खातीर तुम्हे आना होगा. चली आओ , चली आओ, नीलकमल” आणि झोपेत वहिदा चालू पण लागते, मनोज कुमार दुसऱ्या जन्मीचा नवरा आणि शेवटी ती जिथे जाते तिथे लोखंडाच्या साखळ्या सापडतात. पुनर्जन्माची कहाणी इतक्या सहजरित्या सुंदर प्रकाराने वहिदाने साकारली आहे आणि राजकुमार जिवाच्या आकांताने आणि रफीच्या गळ्यातून वहिदा साठी म्हणतो-

आजा तुझको पुकारे मेरा प्यार
आजा मे तो मिटा हुन तेरी चाह मे
तुझको पुकारे मेरा प्यार….

आखरी पल है आखरी आहे तुझे ढुंढ रही है
डुबती सांसे बुजती निगाहे तुझे ढुंढ रही है
सामने आजा एक बार मे तो मिटा हुन तेरी चाह मे…
तुझको पुकारे मेरा प्यार….

एकदा तिने म्हंटल मला “खामोशी” करायची आहे. सगळ्यांनी म्हंटल कि सिनेमा चालणार नाहीं, वहिदा बोलली – कुछ पिक्चर कभी खुद्द के लिये भी कर लेने चाहिये” आणि राजेश खन्ना बरोबर श्वेत श्याम मधे किती छान केमेस्ट्री जुळली- नर्स राधाचा रोल वहिदाने काय सजवला-

हमने देखी है उन आँखो कि मेहकती खुशबू
हात से छू के उसे रिशतो का इलजाम न दो
सिर्फ अहसास है ये मेहसूस करो
प्यार को प्यार ही रेहने दो कोई नाम न दो…

देवानंद बरोबर मद्य पियुन (म्हणजे तसा अभिनय करून) काय नाचली आहे – लालसाडीत…

रंगीला रेssss तेरे रंग मे यु रंग है मेरा मन,
छलिया रेssss न बुझ है किसी जल से ये जलन….

मुमताज बरोबर एक प्रेमाचा खेळ खेळून मनोज कुमारला आपल्या जाळ्यात फसवून पत्थर के सनम मधे जो गावातल्या पोरीचा रोल केला तो कोणीही कधी विसरू नाहीं शकत आणि मनोज कुमारला

बताना क्या लाना
एक छोटासा नजराना
पिया याद रखोगे
कि भूल जाओगे.

…असं म्हणत जाताना छेडचाड करणारी वहिदा सर्रर्रर्र कण समोर दिसली.

एक मोठा काळ गेला आणि वहिदा दिलीप कुमार बरोबर मशाल मधे पुन्हा आली, कभी कभी मधे ती अमिताभ ची बायको झाली तर त्रिशूल मधे अमिताभ ची आई आणि पुढे तर वहिदा अभिषेकाची आई सुद्धा झाली, किती वेगळे पैलू आहे वहिदाचे.

वहिदाचा सिनेमा आणि संगीत नाहीं असली कोळिष्टके जमतच नाहीं – आपल्या खिदमत मधे पेश आहे –

जाने क्या तुने कही (प्यासा), वो शाम कुछ अजीब थी (खामोशी), पर्बतो के पेडो पर (शगुन) , शोखियों मे घोला जाये (प्रेम पुजारी), तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है (खामोशी), कही दीप जले कही दिल (बीस साल बाद), बताओ क्या लाना (पत्थर के सनम), मारे गये गुल्फाम (तिसरी कसम), मेरे घर आई एक (कभी कभी), न तुम हमे जानो (बात एक रात कि), आज फिर जिने कि (गाईड), पिया तोसे नैना (गाईड), वक्त ने किया (कागज के फुल), चौदहवी का चांद हो (चौदहवी का चांद), पिया संग खेलो होली (फागुन), भवरा बडा नादान है (साहिब बीबी और गुलाम)…..

मला असं वाटतं की वहिदाकडून खूप मोठी घोडचूक झाली ती ही कि फागुन सिनेमात तिने जया भादुडीच्या आईचा रोल केला आणि घड्याळाची टिक टिक वाजावी तशी कॅरेक्टेर रोल करण्याची वेळ आली असं वहिदाला भासले पण शगुन सिनेमातून कवलजीत यांनी तिला साद घातली नंतर ती लग्न करून बंगळुरू ला गेली. एका अपघातात तिच्या पतीचे निधन झाले आणि नंतर तब्बल १२ वर्षानंतर अनुपम खेर ज्या वेळी सिनेमा काढायला निघाला कारण त्याने लम्हे मधे वहिदा बरोबर काम केलं, तर अनुपमने ओम जय जगदीश काढला आणि त्यातील वहिदाच्या संवाद “मेरे बच्चे जहाँ खडे हो जाये वोही मेरे लिये घर है”, त्या नंतर रंग दे बसंती, देली ६, लव्ह इन बॉम्बे सारख्या सिनेमातून आली.

गुरुदत्त पासून जो प्रवास सुरु झाला, त्यात सोबतीची आले, देवानंद, राजकपूर, दिलीपकुमार, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, मनोजकुमार, राजेश खन्ना, विश्वजीत, अमिताभ बच्चन, शशी कपूर, कवलजीत, सुनील दत्त, संजीवकुमार, जितेंद्र, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, फर्दिन खान असा आजतागायत सुरूच आहे…

तो प्रवास असाच अविरत सुरु राहो…जुनी पिढी असो वा नवीन पिढी लोकांना आणि तमाम रसिकजनांना वहिदाने कायमच मोहिनी घातली आहे, तिच्या अभिनयाच्या सेवेसाठी तिला २०११ साली भारत सरकार ने तिला पदमभूषण या पुरस्काराने गौरान्वित केले.

एक खंत अशी कि इतकं सगळे करून पहिला नंबर वहिदा कधीच पटकावू शकली नाहीं. सुंदर नाकी डोळी, गोरी गोमटी, अभिनयात कसदार, अप्रतिम संवादफेकी, जुन्याला जुनं आणि नव्याला नवं मानणारी, सरस काम करणारी, कधीही कुठले गुरुदत्त शिवाय प्रसंगात न अडकणारी!! वहिदा रेहमान एक कायम दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबर वर असली, ही खरी शोकांतिका आहे…..

वाहिदांवर चित्रित झालेलं माझं आवडतं गाणं –

वक्त ने किया क्या हंसी सितम्
हम रहे न हम तुम रहे न तुम….

बेकरार दिल इस तरह मिले
जिस तरह कभी हम जुडा न थे
तुम भी खो गये, हम भी खो गये
एक राह पर चल के दो कदम…..

जायेंगे कहा सुझता नहीं
चल पडे मगर रास्ता नहीं
क्या तलाश है कुछ पता नहीं
बुन रहे है दिन ख्वाब दम -ब-दम…..

वहिदाजी जन्मदिन मुबारक हो…..

लेखक : मृणाल जोशी

Add comment