वैजापूर ता,२७
रामायणातील जटायू यांनी स्वाभिमान जपला, तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक व सर्व भारतीयांचे आराध्य दैवत असलेले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण मानव जातीला स्वाभिमानाचे पाठ शिकवून रामराज्य साकारले तेच रामराज्य –शिवराज्य
महाराष्ट्रात पुन्हा स्थापन करण्यासाठी व हिंदू हृदय सम्राट कै, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी येत्या काळात शिवसेना(ठाकरे गट )यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे प्रतिपादन शुक्रवार(ता,२६)रोजी वैजापूर येथील जि,प,प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या रामकथेत केले खा संजय राऊत यांनी केले ,हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वैजापूर चे माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकटगावकर यांनी या कथांचे आयोजन केलेआहे, पांच मिनिटाच्या आपल्या मनोगतात खा,संजय राऊत यांनी चिकटगावकर यांना शुभेच्छा देऊन त्यांना धन्यवाद दिले, या समयी माजी खा,चंद्रकांत खैरे,राज्याच्या विधिमंडळचे विरोधी पक्ष नेते आ,अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती,या सर्वांनी रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांच्या अमृत वाणीतुन रामकथा ही काही वेळ श्रवण केली त्यांनी ही जटायू यांच्या स्वाभिमानाचा उच्चार केला, व छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सर्व स्वामिनिष्ठ सरदारांचा व त्यांच्या मिळालेल्या एकनिष्ठ व स्वाभिमानाचा उल्लेख केला, आयोजक
Add comment