Lokvijay

सावरकारांच्या त्रिखंडात गाजलेल्या उडीला 114 वर्ष पुर्ण झाले

डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, बीड.

8 जुलै 1910 या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्संलिस बंदरात ‘मोरया’ नावाच्या बोटे वरून उडी मारली, त्यांचा हा पराक्रम त्रिखंडात गाजला.जगात प्रथमच भारतीय स्वातंत्र्याची चर्चा सुरू झाली. युरोपियन वृत्तपत्रांनी सावरकरांची तुलना मेजिनी, गॅरिबाल्डी,कोसुथ यांच्याशी केली.” कृतीतून प्रचार” करण्याचे महत्कार्य या उडी ने करून दाखवलेच पण भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक व्यासपीठावर मांडण्यात सावरकर यशस्वी झाले. इंग्रजांच्या खोट्या प्रचाराचा बुरखा फाडला. ही फक्त उडी नव्हती इंग्रजी साम्राज्यावर मारलेली झेप होती. आज आठ जुलै सावरकरांच्या या त्रिखंडात गाजलेल्या उडीला एकशे दहा वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त….

भारतामध्ये सुरू असलेल्या क्रांतिकारी कारवाया पाठीमागे सावरकरच आहेत, सावरकरांच्या सूचनेवरून मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांचा वध केला. इंग्रज सरकारविरुद्ध भारतीय क्रांतीकारकांची फळी उभा करणारे सावरकरच आहेत, हे लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी सावरकरांना कायदेशीर रित्या अटक करून त्यांच्याविरुद्ध खटला भरला. इंग्लंड वरून भारताकडे पुढील कारवाईसाठी चा प्रवास सुरू झाला.

१ जुलै, १९१० यादिवशी सावरकर हिंदुस्थानात परत येण्यासाठी ‘मॊरिया’ बॊटीत बसले. त्यांच्यावर रात्रंदिवस डॊळ्यात तेल घालून दोन इंग्रज पहारेकरी लक्ष ठेवून हॊते. पॉवर आणि पारकर या दोन इंग्रज अधिकाऱ्यांची खास सावरकरांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. सावरकरांच्या डॊक्यात इथुन कसे निसटता येइल हाच विचार चालूहोता. मोरिया बोट मार्सेलिस बंदरात यांत्रिक बिघाडामुळे काही काळ थांबली होती. सावरकरांनी बोटीचे निरीक्षण करून ‘पोर्ट हॊल’ मधून पसार हॊण्याचा निश्चय केला होता. अनायासे बोट इथे थांबली आहे, जर आपण इथुन पॊहत जावून फ्रान्सचा किनारा गाठला तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इंग्रज अधिकारी आपल्याला पकडु शकणार नाहीत. या सगळ्या गोष्टींचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला होता. ८ जुलै, १९१० रोजी शौचकूपात जावून तिथल्या काचेच्यादरवाज्यावर स्वतःचा अंगरखा ठेवला त्यामुळे बाहेर उभ्या पहारेकर्‍यांना आतल्या हालचाली दिसणार नाहीत. खरचटण्याची, ऒरखड्यांची व चामडी सॊलवटण्याची पर्वा न करता त्या अथांग सागरात सावरकरांनी उडी मारली. पॊहत पॊहतते फ़्रान्सच्या किनार्‍यावर पॊचले देखिल पण इंग्रज शिपायांच्या लालचीला बळी पडून फ्रान्सच्या पॊलिसांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. सावरकर जर पकडले गेले नसते तर कदाचित भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न लवकर मार्गी लागला असता सावरकरांच्या पुन्हा अटकेने भारतातील क्रांतिकारी चळवळीला मोठा गतिरोध निर्माण झाला.

वरील घटनेचा अभ्यास केला असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे समुद्रात उडी घेवून किनार्‍यापर्यंत पॊहत पॊहत पोचायचे हा निर्णय घेणे हे दुबळ्याचे काम नाही, यासाठी प्रचंड शारीरिक शक्ति आणि मनाचा निर्धार लागला असणार. दुसरी गोष्ट कायद्याचा व्यवस्थित अभ्यास आणि त्याचा अचुक वापर करण्याची बुद्धि. त्यांच्या याच गोष्टी मला खूप आवडून जातात.

सावरकराची ही उडी पाहून लोककवी मनमोहन म्हणतात,

ही उडी बघतांना मृत्यू कर्तव्य विसरला ।
बुरुजावर झेपावलेला झाशीतील घोडा हसला ।।
वासुदेव बळवंतांच्या कंठात हर्ष गदगदला ।
क्रांतीच्या केतूवरला अस्मान कडाडून गेला ।।
विश्वात केवळ आहेत विख्यात बहाद्दूर दोन ।
जे गेले आईकरिता सागरास पालांडून ।
हनुमानानंतर आहे त्या विनायकाचा मान ।।

– लोककवी मनमोहन

भारतात आल्यावर मुंबईत विशेष न्यायालय निर्माण करून सावरकरांवर इंग्रज सरकारने खटला चालवला. तसेच नाशिक कटाच्या दुसर्‍या खटल्याचे कामकाजही सुरू होतेच. दोन्ही खटल्यांचा निकाल लागला आणि सावरकरांना दोन जन्मठेपेची म्हणजे ५० वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. हे ऐकून सुद्धा या वीराच्या प्रसन्नतेत काहीच फरक पडला नाही. उलट एक इंग्रज अधिकारी जेव्हा त्यांच्याशी कुत्सितपणे त्यांच्या या ५० वर्षे शिक्षेबद्दल बोलला तेव्हा सावरकरांनीच त्याला प्रतिप्रश्न विचारला, ‘ब्रिटिश सरकार तरी इथे अजुन ५० वर्षे टिकणार आहे का?’

सावरकरांची ही भविष्यवाणी खरोखरच खरी ठरली. आणि भारताला १५ ऑगस्ट१९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. आज या त्रिखंडात गाजलेल्या वडीला एकशे दहा वर्ष पूर्ण होत आहेत सावरकरांसारख्या प्रखर राष्ट्रभक्त क्रांतिकारकांनी केलेले योगदान हे भारतातल्या तरुण पिढीला मार्गदर्शकच नाही तर त्यांच्यामध्ये हे राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी महत्वाचे आहे.

रोमांचकारी उडीचे परिणाम…

  • मातृभूमीसाठी प्राण गेले तरी चालेल हा संदेश या उडीने दिला.
  • हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न ‘कृतीतून’ जगाच्या व्यासपीठावर मांडण्याचे काम या उडीने केले.
  • बॅरिस्टर सावरकरांचा कायद्याचा अभ्यास किती दांडगा होता याचा परिचय या उडी ने दिला. फ्रान्समध्ये इंग्रजांचा कायदा चालत नाही त्यामुळे तेथे उडी मारली आणि आपण सुटलो तर पुन्हा इंग्रज पकडू शकत नाहीत हे सावरकरांना माहित होते.
  • उदात्त अपयश हे देखील परिपूर्ण यशा इतकेच जगाला कल्याणकारक ठरू शकते, हे या रोमांचकारी उडीने सिद्ध केले.
  • उडी नंतर सावरकरांवरील खटला हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालला गेला यामुळे जगाचे लक्ष या खटल्याकडे वेधले गेले.
  • 11 जुलै 1910 रोजी डेली मेल या या फ्रान्सच्या वर्तमानपत्राने सावरकरांच्या धाडसी उड्डाणाची बातमी जगभर प्रसिद्ध केली नंतर रायटर या संस्थेने हीच बातमी जगभर प्रसिद्ध केली होती.
  • या उडीमध्ये नुसती प्रचंड कल्पकता नव्हती तर फार मोठा धोकाही होता आणि त्याला तोंड देण्याचे मोठे शौर्य सावरकरांसारख्या क्रांतीकारकाने दाखवून दिले.

सावरकरांनी ज्या ‘मोरया’ बोटीच्या पोर्टहोल मधून निसटण्याची ठरवले तो लहान होता, सवरकरांच्या छातीचा घेर 32 इंच होता,त्यांची उंची पाच फूट दोन इंच होती आणि गळ्याचा घेर 13 इंच होता, इतक्या सहजपणे या पोर्टल मधून आडवे बाहेर पडणे सोपे नव्हते परंतु शारीरिक व्यायाम सावरकर करीत असल्यामुळे अंगाचा संकोच करण्याची कला ते शिकले होते तिचा उपयोग करून ते पोर्टल मधून बाहेर पडले, असे करत असताना छातीची पोटाची कातडी सोलुन निघाली ते रक्तबंबाळ झाले परंतु तोंडातून एकच घोषणा देत ते पुढे पोहोचत होते ती घोषणा होती ” स्वातंत्र्य लक्ष्मी की जय”…

स्मरण अतुलनिय साहसाचे…

2 comments