Lokvijay

जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी अनिल बोरसे यांची निवड जाहीर !

प्रतिनीधी – जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ची एक व्यापक बैठक हर्षवर्धन भागवत कराड यांचे अध्यक्षते खाली दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११वाजता सिडको भागात संपन्न झाली. या समितीची स्थापना १९७० साली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराजभाऊ पवार यांनी केली असुन ते या समितीचे संस्थापक अध्यक्ष असुन ही समिती या वर्षी ५५व्या वर्षात पदार्पण करीत असुनअखंड पणे सातत्य पुर्ण आणि एकात्मतेचा संदेश देणारी एवढी जुनी संस्था देशात एकमेव असुन अनेक समाजोपयोगी उपक्रम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री.पृथ्वीराज भाऊ पवार यांचे कुशल आणि शिस्तप्रिय मार्गदर्शना खाली पार पडत आहे.२०२४ नूतन वर्षाची कार्यकारिणी निवड करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


वर्ष २०२३चे मावळते अध्यक्ष


हर्षवर्धन भागवत कराड यांनी मागील वर्षाच्या कार्य वृतांत या बैठकीत सादर केला.
विवीध समाजोपयोगी आणि एकात्मता निर्माण करणारे उपक्रम हाती घेणे व इतर महत्त्वपूर्ण विषयावर व्यापक चर्चे नंतर वर्ष २०२४ च्या जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद च्या अध्यक्ष पदी अनिल बोरसे पाटील त्यांचे नावं मावळते अध्यक्ष हर्षवर्धन भागवत कराड यांनी सुचविले तर राजु दानवे यांनी त्यास अनुमोदन दिले सदर निवड एकमुखाने व सर्वानुमते करण्यात आली.या व्यापक बैठकीचे प्रास्तावीक व सूत्र संचालन राजेंद्र दाते पाटील यांनी केले.


या बैठकीस सर्वश्री संस्थापक अध्यक्ष पुथ्वीराज भाऊ पवार, जेष्ठ सदस्य तनसुख झांबड, राजेंद्र दाते पाटील,डी.एन पाटील, विनोद पाटील,अभिजीत देशमुख, पंकज फुलफगर, विजय औताडे, राजेंद्र जंजाळ, अभिषेक देशमुख,सचिन खैरे, अनिल बोरसे पाटील, विजय वाघचौरे, राजेन्द्र दानवे,राजु शिंदे,हषवर्धन भागवत कराड, मनोज पाटील,किशारे तुळशीबागवाले,अनिकेत पवार,राजु पारगावकर, संदीप शेळके,हरिष शिंदे, विशाल दाभाडे या सह अनेक मान्यवर .उपस्थित होते.


वर्ष २०२४चे नूतन अध्यक्ष


अनिल बोरसे पाटील यांचा सत्कार या निमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार आणि उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आणि नूतन कार्यकारिणी निवड करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आला तर उपस्थितांचे आभार अभिषेक देशमुख
यांनी व्यक्त केले

Add comment