Lokvijay
blank

सक्सेस इज बेस्ट रिव्हेंज

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील फक्त १५०० लोकसंख्या असेलेल्या ‘निताने’ नावाच्या अगदी छोट्या खेडेगावातील शाळेत जिथे फक्त एकूण ४ च वर्ग होते (रात्री जिथे गुरे-ढोरे बांधली जायची) तिथला हा क़िस्सा ; तिथे एका दुसरीतील मुलाला शिक्षकांनी विचारलं की ‘तुला मोठं होऊन काय बनायच आहे?’ त्याने उत्तर दिले “मला सरकार बनायच आहे” वर्गात एकचं हास्यकल्लोळ उडाला , त्या मुलाच्या मित्रांनी त्याची खुपच थट्टा मस्करी केली , या सगळ्याचा त्या दुसरीतील मुलाला मनस्वी राग आला.

खर तर त्याने असे उत्तर द्यायचे कारण की ,शेतकरी परिवारात एका अगदी सामान्य गरीब घरात या मुलाचा जन्म झाला होता आणि एकदा आई सोबत शेतात असताना एका एस.टी.बस कडे पाहुन त्यानी कुतुहलापोटी आपल्या आई ला विचारले की इतक्या मोठ्या बसचा मालक कोण आहे ? आई ने उत्तर दिले “सरकार” त्याच प्रमाणे कुतुहलापोटी एक दिवस असेच आकाशातल्या विमानाकडे बोट दाखवून त्याने विचारले आई हे विमान कुणाच्या मालकीचे ? भाबड्या अशिक्षीत आईने उत्तर दिले “सरकारचे” आई चे ते उत्तर त्याच्या मनात अश्या प्रकारे ठसले की निरागस पण जिद्दी लहान मुलाने ठरविले की “मी सरकार बनणार” आणि तिच जिद्द मनात ठेऊन अत्यंत बिकट परिस्थीतत या मुलाने शिक्षण चालू ठेवले.

इतकच नाही तर सातवीत असताना दुष्काळजन्य परिस्थितीमुळे या मुलाने रोजगार हमीवर आठवड्याला १५ रुपये या दरानी मजूरी काम सुद्धा पत्करले पण शिकण्याची जिद्द सोडली नाही त्याने मनस्वी पन केला होता की सरकारचा भाग बनून उच्चपदी पोहचूनच दाखवणार.

दहावी आली आणि हा मुलगा रात्रीचा दिवस आणि दिवसाची अक्षरशः रात्र करुन खूप प्रतिकूल परिस्थितीत “केन्द्रात दुसरा क्रमांक” घेऊन चमकला.

त्यानंतर अकरावी मधे त्याने शास्त्र शाखा निवडली पण परिस्थिती अजूनच बिकट झाली होती कारण जवळपास महाविद्यालय नसल्या कारणाने घरापासून तब्बल २३ किलोमीटर स्थित असलेल्या सटाणे येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाला तिथे होस्टेल ला प्रवेश घेण्यासाठी साडेतीन पोती गहू वजा फी जमा करुन परत जोमाने अभ्यासाला सुरवात केली तिथे सुद्धा हा विद्यार्थी संपूर्ण महाविद्यालयात दुसरा येऊन चमकला आणि त्या नंतर बारावी मधे अत्यंत बिकट परिस्थिती मधे स्वबळावर काबाड कष्ट करुन त्याने ८५% असे असाधारण गुण मिळवले.

पण इतके असून सुद्धा देवाला मात्र काही औरच मंज़ूर होते तेंव्हा पुण्यातल्या एकमेव वैद्यकीय महाविद्यालयात , बी.जे.मेडिकलला फक्त १% कमी पडल्या कारणाने त्याला तिथे प्रवेश काही केल्या मिळाला नाही.

इतक्या प्रतिकूल परिस्थितीमधे सरते शेवटी घरात वडीलांनी हताश होऊन ‘शेती करणे’ हा त्यापुढे एकमेव पर्याय असल्याचे त्याला छातीवर दगड ठेऊन सांगितले ज्यामुळे त्याला शिक्षण सोडावे लागणार होते पण फ़ार मोठ्या मनाने आयुष्याचे हे मोठे वळन ही आव्हान समजून या मुलाने हसत स्विकारले आणि आता हा ध्येयवादी मुलगा पुर्णपणे शेतकरी झाला होता रोज़ काळ्या मातीत तळपत्या उन्हात आपला घाम गाळू लागला पण प्रत्येक दिवशी मावळता सुर्य त्याला सतत त्याच्या ध्येयाची आठवण करुन द्यायचा आणि याच विचारात तो कित्येक रात्री झोपू शकला नव्हता आणि दुसरीत त्याच्यावर हसणारी ती वर्गातील मुले त्याला परत परत विचारांमधे खिज़वत होती अर्थात ही परिस्थीत सुद्धा त्याला वाचन करण्यापासून परावृत्त करु शकली नाही हे नवल. शेतात वाचन करताना बरीच लोक़ त्याच्या निश्चयाची खिल्ली उडवत.

एके दिवशी शेतात वडिलांसोबत काम करत असताना वडिलांसोबत या मुलाचे काहीसे वाद झाले आणि परत एकदा या रागाचे रुपांतर त्या दिवशी एका द्रुढनिश्चयात झाले त्या क्षणी त्याने शेती सोडली आणि वडिलांकडून कुठलीच मदत इथुन पुढे घेणार नसल्याचे सांगितले.

आई कडून ३५० रुपयांची मदत घेतली आणि तडक उस्मानिया मुक्त विद्यापीठात बी.ए. (Distance learning graduation in B.A.) करण्याचा निर्णय घेतला ज्याची माहिती वर्तमान पत्रातून मिळाली होती आणि जिद्दीने पेटलेला हा मुलगा २१ लेखी परिक्षा पास होऊन एका वर्षात पदवीधर झाला.

त्यानंतर ठरवल्या प्रमाणे सरकारचा भाग बनण्यासाठी त्याने जिकरीचे प्रयत्न सुरु केले विविध स्पर्धा परीक्षांची माहिती घेतली दिवस रात्र प्रचंड वाचन केले आणि अविरत मेहनत घेऊन MPSC ची PSI साठीची परिक्षा दिली आणि कुणाच्याही मदती शिवाय “महाराष्ट्रात १३वा क्रमांक” पटकावला पण हे यश त्याच्या ध्येयापुढे ठेंगणे होते या सोबतच त्याने “सम्मिलीत रक्षा सेवा परिक्षा” (Combined Defence Services Exam) सुद्धा दिली आणि त्यात “भारतात दुसरा क्रमांक” मिळवला पण या मुलाने यशाने विरघळून न जाता परत एकदा प्रयत्नाची पराकाष्ठा करुन थेट पोलिस उप-अधिक्षकपदासाठी (Dy.SP) प्रयत्नांची शर्थ केली.

जुने शिक्षक , मित्र, काही परिचित , काही ग्रंथालये अश्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरुन एक एक पुस्तक गोळा केले काही लेख / मासिके गोळा केली. या परिक्षेसाठी इतर कुठ्लाही खर्च न करता फक्त एक पुस्तकावर निव्वळ ७० रुपये खर्च केले.
ना कुठले प्रशिक्षण वर्ग , ना कुणाचे मार्गदर्शन, ना कुणाची मदत , ना कोणी गुरु इतकी भयानक परिस्थिती असताना हार न मानता हा मुलगा सतत अभ्यास करत राहिला आणि फक्त ३ रिक्त जागा असताना आणि हजारोंच्या संख्येने परीक्षार्थी असताना हा मुलगा “महाराष्ट्रात दुसरा आला.”

“प्रयत्ने वाळू चे कण रगडीता तेल ही गळे ” वयाच्या २२व्या वर्षी हा मुलगा पोलिस उप-अधिक्षक ( Dy.SP) झाला होता.

आणि एवढ्यावरच नाही तर ठरविल्या प्रमाणे सरकारी उच्च पद मिळाल्यावर त्याने देशासाठी स्वतःला अक्षरशः झोकून दिले पण ज्ञान घेणे आणि वाचन अविरत चालू ठेवले ; पुढे त्यांनी मानसशास्त्र विषयातसुद्धा पदवी घेतली.

१९९३ च्या अतिरेकी बॉम्बस्फोटात स्वतःचे कार्य क्षेत्र नसतांना ही त्या दहशतवादी तपास पथकात विनंती करुन स्वतःला समाविष्ट करुन घेतले इतकंच नाही तर देशातील सर्वात मोठा हत्यारांचा (AK56) आणि स्पोटक साठा जप्त करायची कामगिरी अत्यंत कुशलतेने पार पाडली आणि दहशतवादी हालचालींना आळा घातला.

त्यानंतर अनेक मोठे गुन्हे त्यांनी आपल्या हुशारीने आणि धाडसीपणे हाताळले आणि गुन्हांमधे त्यांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात लक्षणीयरित्या घट घडवून आणली या मधे त्यानी हाताखालचा प्रत्येक कर्मचारी जवाबदारीने काम करेल आणि शिस्तबध राहील याची काळजी घेतली , सरकार ने विविध मोठे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला पण त्यानी नेहमी त्याचे श्रेय कनिष्ट कर्मचारी यांनाच दिले.

सतत शिकण्याच्या वृत्तीची जोपासणा करुन पुढे त्यांनी “आय.पी.एस” चे शिखर ग़ाठले आणि इतकच नाही हा विलक्षण माणुस पुढे विशेष कमांडो ट्रेनिंग घ्यायला भारत सरकार च्या वतीने निवड होऊन अमेरिकेत गेला आणि तिथे सुद्धा “Statergic Planning” या विषयात सुवर्ण पदक पटकावले जे अमेरिकेत ‘फेडरल लॉ एन्ट्रंस’ने त्यांना बहाल केले ज्याने भारताचे नाव अमेरिकेत सुद्धा झळकले.

अमेरिकेत त्यांनी आपल्या त्याच भाबड्या आईला मात्र आवर्जून नेले होते जीला आपला मुलगा खेडेगावात शिकुन आता इंग्रजीच अमेरिकेत कसं करणार ? याची निरागस काळजी लागली होती आणि याच ध्येयवेड्या माणसाला या वेळी चक्क “United Nations” ने बोलण्यासाठी आमंत्रित केले होते आणि महाराष्ट्रातल्या छोट्याश्या खेड्यातून आलेल्या या माणसाच्या तब्बल “दिड तासांच्या” भाषणानंतर तिथल्या खचाखच भरलेल्या ‘युनाइटेड नेशन्स जनरल असेंबलीच्या’ त्या हॉल मधे काही काळ टाळ्यांचा कडकडाट सोडून काहीच ऐकू येत नव्हते.

दुसरीत त्यावर हसणारी ती मुले/खिशात पैसे नसताना शेतात राबत असताना IPS च्या ध्येयावर चेष्टा करणारी ती लोकं आणि आपापल्या परिस्थितीला विवशतेचे नाव देऊन हताश होणारी ती सर्व लोक यांच्या तोंडावर पडलेली ती एक सनसणीत चपराक होती.

शेतकरी ते आय.पी.एस. असा थक्क प्रवास करणारा हा विलक्षण माणुस म्हणजे भारतीय पोलिस सेवेतले आताचे आपले माननीय डी.आय.जी.श्री.प्रताप दिघावकर .

शिवरायांना दैवत मानणारे प्रताप दिघावकर “सक्सेस इज द बेस्ट रिवेंज” हे काय असते नुसते ते नाही तर “प्रयत्नार्थी परमेश्वर” म्हणजे काय याची सुद्धा प्रेरणा आपल्याला त्यांच्या कारागिर्दीतून देतात.

त्यांनी त्यांच्या गावातील त्याच शाळेसाठी २५ लाख रुपये गोळा करुन बरीच मदत केली तसेच सुधारणा ही घडवून आणली आणि आज स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तिथे खास केंद्र सुद्धा आहे. आज ३०० हून अधिक युवक तिथे IAS / IPS चे स्वप्न घेऊन झटत आहेत . तसेच तळागाळातील हवालदार पदावरील पोलिसांसाठी माफक दरात स्वतः चे मोठे घर मिळेल यासाठी भारत सरकार कडुन १२० एकर मधे १०००० सदनीकांच्या मोठ्या योजने साठी बरेच प्रयत्न करुन ती योजना पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतली आहे जेणे करुन त्यांचा ही परिवार मोठया घरात राहू शकेल; या व्यतिरिक्त एक शेतकरी या नात्याने आपल्या मातीसाठीचे कर्तव्य म्हणून सुमारे दोन लाख झाडांचे त्यांनी वृक्षरोपन आणि संवर्धन केले याची दख़ल घेऊन भारत सरकार ने २००३ मधे त्यांना #वन्यपरिक्षेत्राचासर्वोच्च_पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा केले आहे.

त्यांची कारागिर्द आपल्याला आणि येत्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

क्यू मरते है सनम के लिये

मरना है तो मरो वतन के लिये

जिंदगी मे करो कुछ ऐसा काम

तिरंगा नीचे आये तुम्हारे कफन के लिये…

Add comment