वैजापूर ता३०
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुण्यतिथी दिन हुतात्मा दिन म्हणून संपूर्ण देशभर पाळला जातो, या दिनी सकाळी११-००वाजता दोन मिनिटे शांत उभे राहून हुतात्म्यांना अभिवादन करतात,मंगळवार (ता,३०)रोजी येथील नगरपालिका कार्यालयात प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत( राजपूत)यांच्या सूचनेनुसार उपमुख्याधिकारी राहुल साठे यांच्या उपस्थितीत प्रथम जेष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व उपमुख्याधिकारी राहुल साठे यांनी सकाळी ११ -००वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व दोन मिनिटे स्तब्ध व शांत उभे राहून हुतात्म्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली, भांडरपाल वाल्मिक शेटे, जयपालसिंह राजपूत,अरूण कुलकर्णी,अभियंता मोदाणी,अभियंता चिमटे,लेखापाल श्री मुळे, मंजिरी खैरे,श्रीमती ,जोशी ,विष्णू आलूले,व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Add comment