Lokvijay

गरवारे कम्युनिटी सेंटर मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

गरवारे कम्युनिटी सेंटर मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले होते दि.९ मार्च २०२४ रोजी महिलासाठी “खेळ पैठणीचा एक मिनिट शो” घेण्यात आला यामध्ये महिलासाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले तसेच महिलासाठी चित्रकला आणि वेस्ट पासून बेस्ट वस्तू बनविणे स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये महिलांनी स्त्रीचे विविध रूपे आणि बेटी बचाव या विषयावर खूप सुंदर चित्र काढले आणि वेस्ट सामानापासून विविध उपयोगी वस्तू बनवल्या जसे फ्लॉवर पॉट, वाल पीस, नेम प्लेट, डेकोरेशन ची भाऊली, साडी पासून पायदान अशा विविध वस्तू बनवल्या.


दिनांक 11 मार्च २०२४ रोजी महिलांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला यामध्ये जवळपास 30 परफॉर्मन्स सादर करण्यात आली वय वर्ष 18 ते ४५ या वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला होता यामध्ये कोणी सुंदर असं भारुड, गायन, एक पात्री नाटक, योगासन प्रात्यक्षिक , ग्रुप डान्स आणि सोलो डान्स असे विविध प्रकार सादर केले . याप्रसंगी प्रमुख अतिथी सौ. सुनिता पाठक, महिला विभाग प्रमुख सुलभा जोशी आणि गरवारे कम्युनीटी सेटर चे सचालक श्री सुनील सुतवणे यांच्या हस्ते चित्रकला आणि हस्तकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.


कार्यक्रमाचे सूत्र संचलन कु.तनया गावडे हिने केले.


चित्रकला स्पर्धेत विजेते – दीपिका कोलते, भग्याश्री बनसोड, वैशाली जायभाये, स्मिता पाटील


हस्तकला स्पर्धेत विजेते – शीतल रौतल्ले, प्रीती चौधरी, रंजना सामग, जयश्री स्वामी.

Add comment