Priti Kankaria
अगदी परवा whatsapp वर एक बातमी वाचली, 14 वर्षीय मुलगा घरातून class साठी गेला तो त्या दिवशी परतलाच नाही आणि काळजात धस्स झाले. मुलं तुमची असो की माझी त्यांच्या बद्दल च्या आई – बाबांच्या भावना ह्या कमी अधिक प्रमाणात सारख्याच असतात.
काय झाले? हा प्रश्न ही नको कारण 2 पिढ्यामध्ये मतभेद हे होणारच.
मत जुळले नाही की वाद होतात, राग येतो, रागाच्या भरात नको ते शब्द तोंडातून निघतात, थोडक्यात काय की आपण overreact होतो आणि चर्चेचा मूळ मुद्दा बाजूला राहून भलत्याच दिशेने आई – बाबा आणि मुलांमधले भांडण जाते. ह्या भांडणाचे फलस्वरूप काही वेळ अबोला, कधी रागात स्वतःला खोलीत बंद करून घेणे, कुठे बाहेर निघून जाणे किंवा अगदी नकार पचवणे जमलेच नाही तर कधी कधी ही मजल आत्महत्या पर्यन्त ही जाऊ लागली आहे. आज पर्यन्त असे अनेक उदाहरण आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो. समाजाचे हे चित्र पाहणे, काही काल हळहळणे, कालांतराने विसरणे आणि पुन्हा एखादा असा प्रसंग होतो तोपर्यन्त routine जीवन जगणे असा काहीसा बोथट जगण्याचा पॅटर्न आज आपण जगायला लागलो आहोत असे मला वाटते.
With all due respect to the said family मला as a psychologist & counsellor एकच विचार डोक्यात येत आहे की अश्या घटना कश्या avoid करता येतील?
माझ्या मते रोजच्या जीवनात काही छोटे छोटे फरक जर आपण डोळसपणे केले तर हे टाळण्यासाठी मदत मिळू शकेल —
सगळ्यात आधी हे बदल का करावे?
हा प्रश्न तुमच्या मनात येणे स्वभाविक आहे. तर मुलं किशोरवस्थेत आली की त्यांच्या मध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांचा त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो हे जाणीवपूर्वक जाणून घेणे प्रत्येक आई – बाबा, परिवाराचे इतर सदस्य, शिक्षक आणि समाजाचे हिताचे ठरेल असे मला वाटते. ह्या वयात मुलांच्या विचारसरणीत खूप बदल होत असतात. त्यांना विविध प्रश्न पडत असतात. अश्यावेळी जर त्यांच्याशी आजूबाजूच्यालोकांनी संवाद साधला तर नक्कीच फायदा होऊ शकतो.
बरं संवाद म्हणजे —
तू आता मोठा झाला आहेस, हे कर, असे कर, तसे करू नकोस, तुला एवढे कळत नाही? असे instructions म्हणजे संवाद नाही. सगळ्यात आधी तर किशोरवस्थेतील मुलांचे ऐकणे, ऐकून घेणे म्हणजे प्रभावी संवाद साधने होय. त्यांच्या देहबोली कडे लक्ष ठेवणे, त्यातले सूक्ष्म बदल ओळखने, त्यांना बोलते करने, घरातल्या छोट्या छोट्या कामांबरोबरच निर्णयांमध्ये ही मुलांचा सहभाग करून घेणे महत्वाचे आहे. ह्या वयात अभ्यास हा महत्वाचा आहेच पण ह्याच बरोबर मुलांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण (personality development) ही तितकीच महत्वाची असते हे आपण सर्वजण मान्य करतो. मुलांचे व्यक्तिमत्व हे alround develop होण्यासाठी पालकांचे मुलांशी मनमुराद, मोकळे बोलणे , त्यांचे ऐकणे, त्यांना समजून घेणे, समजावून सांगणे मुलांच्या भावनिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते. मुलांशी अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या आवडीनिवडी, मित्रमंडळी, स्वप्न, शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल त्यांच्या मनात येणारे विचार, प्रश्न,शाळेतले वातावरण, शिक्षकांशी संवाद, समाज, त्यांच्या वयाला साजेल असे सामाजिक उपक्रम, healthy diet, exercise आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खेळ ह्याबद्दल सतत, (वेळ मिळेल तेव्हा) चर्चा केली पाहिजे, brainstorming केले पाहिजे. आमच्यावेळी असे होते, आम्ही हे करायचो, ही वाक्ये आता replace करणं काहीसे जरुरी झाले आहे.
आपण ही गोष्ट, अशी केली तर त्याचे परिणाम असे होतील किंवा होऊ शकतात. काय वाटते तुला?
मुलाचे मत आपल्याला खूप काही शिकवते. आजची पिढी smart, हुशार and sensitive आहे. ह्या त्यांच्या गुणांचा नक्कीच आपण परिवार आणि समाजहितासाठी सकारात्मक उपयोग करवून घेऊ शकतो.
दुसरे एक मला खास करून सांगावेसे वाटते की साधारण 9 -10 वी च्या मुलांना बहुतेक पालक खेळ सोडून पूर्ण फोकस अभ्यासावर करायला भाग पाडतात. आणि नेमके ह्याच वयात मुलांचे energy लेवल high असते आणि खेळामधून ह्या energy ला positively channelize केले जाऊ शकते.
दुसरे म्हणजे research सांगते की माणसाच्या मेंदूचा जो भाग आपल्या शारीरिक हालचालीना control करतो तोच भाग learning and memory boost करतो. मग ही नैसर्गिक क्रिया जर आपण समजून घेतली तर लक्षात येईल की खेळणारा मूल अभ्यासात तेवढाच तरबेज, active होऊ शकतो. Science सोपे आहे, खेळल्याने मेंदूला oxygen पुरवठा वाढतो आणि आपल्या ज्ञान ग्रहण करण्याच्या शक्तीला वाढवतो.
खेळण्याचे इतर अनेक फायदे सर्वश्रुत आहेत जसे –
- Team building
- Leadership
- हार स्वीकारणे ( Acceptance & Coping )
- पुन्हा लढायला ( जिंकण्यासाठी ) तयार होणे – Resilience
- इतरांच्या जीत मध्ये आनंदी होणे (Sportsmanship Spirit)
- इतरांकडून शिकणे ( Horizontal Learning )
- इतरांना शिकवणे ( Horizontal Mentoring )
- Physical fitness
- Mental satisfaction
असे अनेक फायदे आहेत.
तर आपण जर मुलांना रोज कमीतकमी 1 तास खेळू दिले तर ह्या खेळण्याचा मुलांच्या सर्वांगीण विकासावर नक्कीच चांगला प्रभाव पडेल असे मला वाटते. तरी पालक म्हणून, परिवार म्हणून आणि समाज म्हणून आपण नक्कीच आपल्या कोणत्याही वयाच्या मुलांशी खासकरून किशोरवस्थेतील मुलांशी परिणामकारक संवाद (Effective Communication) साधायला सुरुवात करू आणि आपल्या मुलांचे भावाविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न करू ही सदभावना
Add comment