Lokvijay

छत्रपती संभाजीनगरमधील सात पोलीस निरीक्षकांच्या विदर्भात बदल्या

चार वर्षापासून शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या सात पोलीस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री विदर्भातील नागपूर, गडचिरोली आणि अमरावती येथे बदल्या करण्यात आल्या. यात पाच निरीक्षकांची बदली नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात झाली आहे.

राज्यातील विविध ठिकाणाहून पाच पोलीस निरीक्षक शहरात बदलून आले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि कंसात बदलीचे ठिकाण. क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील (नागपूर शहर), छावणी वाहतूक शाखेच्या निरीक्षक राजश्री आडे (नागपूर शहर), हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार (नागपूर शहर), वाहतूक शाखेचे निरीक्षक कैलाश देशमाने (नागपूर शहर), विशेष शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे (नागपूर शहर), दौलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगरकर (गडचिरोली), पोलीस नियंत्रण कक्षातील निरीक्षक हनुमंत गिरमे (अमरावती शहर) या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

चार पोलीस निरीक्षक शहरात…

पोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे व पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, (नागपूर शहर पोलीस आयुक्तालय), पोलीस निरीक्षक अनिल देवढे (पिंपरी चिंचवड), रेखा लोंढे (अमरावती) आणि कुमारसिंग राठोड हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातून बदलून येत आहे.

Add comment