जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांनी तंबाखू वापराच्या वेगाने पसरणा्या साथीकडे आणि त्यापासून उद्भवणाऱ्या रोगराई तसेच मृत्यूंकडे जागतिक नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी ७ एप्रिल १९८८ हा दिवस ‘जागतिक धुम्रपान विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. प्रत्येक नागरिकाला आरोग्य प्राप्त करण्याचा व निरोगी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे व म्हणूनच तंबाखूमुळे होणारे प्रतिबंध करण्याजोगे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे प्रयत्नही करायला हवेत हा विचार या आयोजनामागे होता. सात एपिल हा ‘जागतिक आरोग्य दिन’ असल्याने १९८८ नंतर ‘जागतिक धुम्रपानविरोधी दिन’ ३१ मे रोजी साजरा करण्याचे ठरविण्यात आले. यंदाही या दिवशी तंबाखूविषयक बरीच चर्चा झाली. तरी अनेक मुद्दे दुर्लक्षित राहिले आहेत. इ.स. पूर्व ६००० वर्षांपासून तंबाखूची लागवड व वापर याविषयीची माहिती उपलब्ध आहे. तंबाखू हे नगदी पीक असल्याने इंग्लंडसारख्या सामाज्यवादी देशांनी त्यांच्या मागास देशातील वसाहर्तींमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची लागवड केली. तंबाखूतील निकोटीन हे द्रव्यच तंबाखूसेवन करणाऱ्याला व्यसनाधीन बनवत असते. त्यामुळे तंबाखू तोंडात ठेवली काय, तपकिरीतून नाकात ओढली काय, मिश्रीच्या रुपात दात घासायला वापरली काय किंवा बिडी-सिगारेट-हुक्का असा धुम्रपानाच्या पद्धतीने शरीरात घेतली काय, त्यामुळे होणारे सर्व मानसिक-शारीरिक परिणाम हे निकोटीनमुळेच होत असतात. निकोटीनमुळे सुरुवातीला व्यक्तीला ताजेतवाने वाटते, पण नंतर मात्र त्याच्या मज्जासंस्थेचे काम थंडावते. शरीराच्या जवळजवळ सर्व इंद्रियांवर तंबाखूमुळे दुष्पपरिणाम होतात.
गुटखा खाणाऱ्या लोकांना तोंड उघडायला त्रास व्हायला लागतो. नंतर तोंडात कर्करोग होतो. धुम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो. तंबाखूचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्यमान तंबाखून घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी असते. जगातील सर्व मृत्यूंचे कारणे बघितल्यास लक्षात येते की, तंबाखू हे मृत्यूचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. तंबाखूमुळे दरवर्षी जगात ५० लाख लोक मृत्यूमुखी पडतात. दर दहा पुरुषांमागे एकाचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. धुम्रपानाचे पूमाण असेच वाढत राहिले तंबाखूमुळे दरवर्षी १ कोटी व्यक्तींचे प्राण जातील. सध्या तंबाखूचा वापर करणाऱ्या ६५ कोटी व्यक्तींचा मृत्यू आज ना उद्या तंबाखूमुळे होऊ शकतो.
धुम्रपानामुळे होणारा फुफ्फुसाचा वा श्वसनसंस्थेच्या इतर भागांचाकर्करोग ही जगाला भेडसवणारी एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. सध्या जगात सर्वात जास्त प्रमाणात हाच कर्करोग आढळून येतो. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे ५१% रुग्ण विकसनशील राष्ट-ांमध्ये आढळून येतात. यात ७५% रुग्ण पुरुष असतात. श्वसनसंस्थेच्या कर्करोगाच्या गटातील एकूण रुपणांपैकी ८५% पुरुष रुग्णांमध्ये व ४६% स्त्री रुग्णांमध्ये कर्करोगाचे कारण धुम्रपान ही असते. या कर्करोगाच्या एकूण रुग्णापैंकी १/३ रुग्ण वयाच्या पासष्ठ वर्षांआधी मरण पावतात. भारतात झालेल्या एका अभ्यासानुसार धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा ८.६ पट जास्त असते.
तंबाखूचा वापर कमी व्हावा यासाठी जागतिक आरोग्य संघटना मोलाचे कार्यरत करित आहेत. ‘Somking or health – Choice is yours असे घोषवाक्य याआधी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने दिले होते. तंबाखू मुळे ज्ञानेंद्रिये, पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था तसेच उत्सर्जन प्रजनन संस्था या सर्वांवरच दृष्परिणाम होतात. म्हणून जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी ३१ मे ला एखादे विशिष्ट्य घोषवाक्य देऊन त्या त्या समस्येकडेलक्ष वेधत असते.
जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखूच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य व्यावसायिकांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य व्यावसायिक म्हणजे फक्त डॉक्टर नव्हेत, तर यात परिचारिका, दंतवैद्य, प्रसविका, भौतिकोपचारतज्ज्ञ, औषधीशास्त्रज्ञ तसेच इतर निगडीत व्यावसायकांचाही समावेश होतो. तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतील. यात तंबाखू उत्पादनांचा वापर थांबवण्यासाठी किमतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कायदे करावे लागतील, या बरोबरच तंबाखूचे व्यसन लागूच नये यासाठी लोकशिक्षणाचे कार्यक्ूम आयोजित करावे लागतील.
आरोग्य व्यावसायिक या सर्व प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये त्यांचा शिरकाव असतो. समाजातील बहुतांश लोक आरोग्य व्यावसायिकांच्या संपर्कात येतात. लोकांमध्ये वर्तणूकविषयक बदल ते घडवून आणू शकता. तंबाखूचे दुष्परिणाम, व्यसन सोडवण्यासाठीचे उपाय याची माहिती ते लोकांना देऊ शकतात. आरोग्य व्यावसायिकांनी धुम्रपानाच्या दुष्परिणामांषियी आणि ते सोडण्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी समुपदेश न केल्यास अनेक व्यक्ती व्यसनाला रामराम ठोकू शकतात. धुम्रपानाचे प्रमाण कमी करण्याचा हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय असल्याचे अनेकशास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. आरोग्य व्यावसायिक स्वतःच्या वर्तनातून एक आदर्श निर्माण करु शकतात. त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करुन ते राजकारण्यांना तंबाखूविरोधी कायदे करण्यासही भाग पडूशकतात. भारतातील आरोग्य व्यावसायिक जागतिक आरोग्य संघटनेची ही अपेक्षा पूर्ण करु शकतील का, हा कळीचा प्रश्न आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये धुम्रपानाच व तंबाखूसेवनाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे धूमूपान वा तंबाखूमुक्त जगाचे स्वप्न पाहायचे असेल तर प्रथम या डॉक्टरांना तंबाखूचा, वापर थांबवावा लागेल. स्वतः सिगारेटचा धूर सोडत रुग्णाला धुम्रपान सोडण्याचा सल्ला दिल्यास त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण याबाबत आरोग्य व्यावसयिकांसाठी अगदी चपखल बसते. जॉर्ज बर्नार्ड शॉला कोणीतरी सिगारेट सोडण्याचा सल्ला दिला. त्यावर तो म्हणाला, ‘त्यात काय एवढं मोठं? मी आतापर्यंत ५२ वेळा सिगारेट सोडलीय’ एकूण व्यसनी लोकांची अवस्था ‘इक ठोकरसे अभी सँभले नही थे के फिर खाई ठोकर सँभलते संभलते’ अशी असते. त्यामुळेच व्यसन सोडण्यासाठी त्या व्यक्तीने निर्धारपूर्वक प्रयत्न करायला हवेत. या प्रयत्नात त्यांना आरोग्य व्यावसायिक, त्यांचे कुटुंबीय, शासन तसेच स्वयंसेवी संस्था या सान्यांचे सहकार्य मिळाले तरच जागतिक आरोग्य संघटनेचे तंबाखूमुक्त जगाचे स्वप्न साकार होऊ शकते.
Add comment