Lokvijay

नामांतर लढा सामाजिक सत्तेसाठी होता……. श्रावणदादा गायकवाड

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)

आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने नामविस्तार दिनानिमित्त मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे नामांतर शहीद कुटुंबांचा सन्मान व लढा नामांतराचा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. रामराव दाभाडे होते तर उद्घाटन प्राचार्य सुनिल वाकेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी महापुरुषाच्या प्रतीमेस अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी बोलतांना समितीचे अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी 28 आंदोलक शहीद बऱ्याच कार्यकर्त्याच्या घरादाराची राखरांगोळी झाली, काहींना तुरुंगवास भोगावा लागला 17 वर्षाच्या संघर्षानंतर शहिदांच्या बलिदानातून आंबेडकरी समाजाच्या जनरेत्यामुळे नामविस्तार करण्यात आले या लढ्यात परिवर्तनवादी व समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता जाती – जाती मधील अंतर कमी करून सामाजिक समता प्रस्थापित करणेसाठी नामांतराचा लढा उभा राहिल असेही शेवटी गायकवाड म्हणाले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मा.अजिंक्य चांदणे, स.सो. खंडाळकर, चुन्नीलाल जाधव, बालाजी सोनटक्के, ॲड. हनुमंत कांबळे, प्रा.संजय वानखेडे यांनीही नव्या पिढीला नामांतराचा इतिहास माहीत व्हावा यावर प्रकाश टाकून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंचावर प्रा.अरुण कांबळे, कृष्णा बनकर, श्रीमती कांचनताई सदाशिवे, जय गजभिये यांची उपस्थिती होती.

तसेच नामांतर लढ्यातील शहीद पोचिराम कांबळे यांच्या कुटुंबातील त्यांचा मुलगा बाबू कांबळे, चंदन कांबळे यांच्या पत्नी सुरेखाताई वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतांना त्यांच्या ताफ्यासमोर आपली 2 वर्षांची मुलगी फेकून ताफा अडवून निवेदन घेण्यास भाग पाडणाऱ्या जमनाबाई गायकवाड यांची संगीता प्रधान यांचा समितीच्या वतीने सन्मान निधी , बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ संविधान 22 प्रतिज्ञा संच व स्मृतिदिव्ह साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला याबरोबर नामांतर आंदोलनातील सक्रिय सहभागाबद्दल मधुकर चांदणे, भिमराव आरके, भागवत सुरडकर, अशोक सुरडकर, अरुण दिवे, राजकुमार उपदेशे, अरुण पाईकडे, अशोक मोरे, सदानंद खडसन यांचाही सत्कार करण्यात आला यानिमित्ताने नामांतर शहीद कुटुंब, आंदोलक कार्यकर्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार स्वागताध्यक्ष संतोष मोकळे, कमलेश चांदणे, संजय जाटवे यांनी केला.
कार्यक्रमात नानासाहेब शिंदे एस. एस. जमधडे, मोहनलाल गोरमे, बाळुभाऊ वाघमारे, किशोर गडकर, मधुकर ठोंबरे, वसंतराज वक्ते, सुनिल खरात, भगवान गंगावणे, मधुकर त्रिभुवन, राम भालेराव, सुनिल अंभोरे, विजय मोरे, शरद किर्तीकर, राष्ट्रपाल गवई, प्रकाशभाई जाधव, प्रवीण खरे, भिमराव गव्हाळे, उत्तम जाधव, नायबराव दाभाडे, रामभाऊ पेटकर, बि. झेड. उफाडे, अमोल गोरपडे, अमोल भिवसने, चेतन गायकवाड, काकाजी कोळसे, भिमराव मोरे, काकाजी शिरसाठ, बाळू साळवे, बबन गायकवाड, अनिल इंगळे, विक्की शेजवळ, सतिश ससाणे, सागर साळवे, संतोष आकोदे, प्रा. किर्तीलता पेटकर, संतोष बनपुरे, वंदना नरवडे, रवी बोर्डे, साधना पठारे, ॲड. पुष्पा घोडके, लीलावती पठारे, पुष्पा मोरे, सुजाता गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल वडमारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद कासारे, अरुण खरात, नवल सूर्यवंशी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुणांनी उपस्थिती होती.

Add comment