Lokvijay
blank

सिडको भागातील १९ अनाधिकृत नळ खंडित

माहिती व जनसंपर्क विभाग

मा.आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथक चे प्रमुख मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या अधिपत्त्याखाली सिडको भागात एन-४, एन-५ येथे विविध ठिकाणी छत्रपती . संभाजीनगर महानगरपालिकेच्या१५० मिमी जलवाहिनी वरील एकूण १९ अनधिकृत नळ खंडित करण्यात आले. सदरील ठिकाणी अनधिकृत नळ बाबत तक्रारी प्राप्त झाल्या नंतर ताबडतोब खंडित करण्यात आले. पथकाला प्राप्त होणाऱ्या अश्या तक्रारींमुळे या सारख्या कार्यवाही चालू राहतील.

सदरील कारवाही ही पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता भूषण देवरे, कल्याण सातपुते पथक कर्मचारी वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, मो. शरीफ, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार
आदींनी पूर्ण केली.

Add comment