Lokvijay

२६ जानेवारी व अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्टापणा निमित्ताने दे.ऋ.मडांळातफऀ ८ वे रक्तदान शिबिराचे संपन्न

छत्रपती संभाजीनगर

दरवषीऀ प्रमाणे याही वर्षी दे.ऋ.ब्राह्मण समाजातर्फे १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला आयोजित करण्यात येत असते आज देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिन आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा निमित्त आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भव्य 8वे रक्तदान शिबिर दत्ताजी भाले रक्तपेढी येथे आयोजित केले होते 38 दात्यांनी रक्तदान करून आनंद उत्सव साजरा केला विशेष म्हणजे यामध्ये महिलांची उपस्थिती जास्त होती तसेच नवीन रक्तदात्यांनी सुद्धा रक्तदान केले असेच नवीन रक्तदाते रक्तदानास तयार झाल्यास आपल्या भारतात रक्ताची कमतरता कधीच भासणार नाही आणि अनमोल जीव वाचतील यात शंकाच उरली नाही यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री नरेश जोशी यांनी सर्व रक्तदात्याचे आभार मानले या रक्तदानासाठी सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले यावेळी मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले की रक्तदान हे आताच्या काळात फार जरुरी आहे तरी जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावे शेवटी दत्ताजी भाले रक्त पेढी सर्व रक्तदात्याचे व पदाधिकारी चे आभार मानले.

Add comment