Lokvijay
blank

काळरात्र ! कपड्याच्या दुकानाला आग; एकाच कुटुंबातील ७ मृत्यूमुखी

आज (३ एप्रिल) पहाटे धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या एकाच कुटुंबातील ७ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लमध्ये महावीर जैन मंदिरच्या बाजूला हे कपड्याचं दुकान होतं. या दुकानात पहाटे अचानक आग लागली. या आगीमुळे सात जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये दोन मुले, दोन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे.

दुकानामध्ये नेमक्या कोणत्या कारणाने आग लागली, हे अजून समजलेलं नाही. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं. आसिम वसीम शेख (3 वर्ष मुलगा), परी वसीम शेख (2 वर्ष मुलगी), वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम ( महिला 23 वर्ष), हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष), रेश्मा शेख (22 वर्ष) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

Add comment