Lokvijay
सौ,विजयाताई  पाटील चिकटगावकर महिलांशी हळदी ,कुंकूम,लपून संक्रांत भेट देताना

वैजापूरात  संक्रांत निमित्त महिलांचा भव्य हळदी कुंकूम कार्यक्रम; महिलांची मोठी गर्दी

वैजापूर ता,२९

मकर संक्रांत हा नेमका महिलांचा सण समजल्या जातो संक्रांत झाल्यानंतर जवळपास १५ते२०दिवस
हा सण महिला मोठ्या उत्साहाने  सामूहिक हळदी कुंकुक,व तीळगूळ व भेट वस्तू एक दुसऱ्यांना देऊन
स्नेह,आपुलकीने सौभाग्याचे लेणे हळद कुंकूम लावून मोठ्या उत्साहाने साजरा करतात याची प्रचिती रविवार(ता,२८)रोजी शहरातील जि,प,प्रशालेच्या मैदानावर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर च्या माजी अध्यक्षा सौ, विजयाताई भाऊसाहेब पा, चिकटगावकर यांनी शहरातील व ग्रामीण भागातील जवळ पास चार हजार महिला,भगिनींना या निमित्ताने निमंत्रित करून सुंदर असा कार्यक्रम वैजापूर शहरात प्रथमच घडवून आणला,महिलांनी अत्यंत आनंद, उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला सौ, विजयाताई भाऊसाहेब पा,चिकटगावकर याना  सौ,वृषाली प्रशांत शिंदे,सौ,माधुरी अजय पाटील,सौ,माधुरी भाऊसाहेब गलांडे,सौ ,सीना मनाजी मिसाळ ,सौ,मीराबाई साईनाथ मतसागर,सौ, संगीता राजपूत, सुरेखा निकम,मंगल मगर,निकिता राजपूत, स्वाती जाधव,सुनंदा निकम,ज्योती निकम,निर्मला निकम,प्राजक्ता शिंदे,त्यांना माजी आ,भाऊसाहेब पा, चिकटगावकर,प्रशांत शिंदे,अजय पाटील,भाऊसाहेब गलांडे,साईनाथ मतसागर,धोंडीरामसिंह राजपूत यांनी सहकार्य केले.

सौ,विजयाताई  पाटील चिकटगावकर महिलांशी हळदी ,कुंकूम,लपून संक्रांत भेट देताना

Add comment